ठाणे महानगरपालिकेने (TMC) 28 मे ते 31 मे दरम्यान मेट्रो बांधकामाच्या कामामुळे माजिवडा उड्डाणपुलावरील रात्रीची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मुंबईहून नाशिक, घोडबंदर आणि भिवंडीकडे माजिवडा पुलावरून जाणाऱ्या सर्व वाहनांवर परिणाम होईल. कापूरबावडी वाहतुक उपविभागाचे हद्दीत माजिवडा मेट्रो स्टेशनवर, 28 ते 31 मे पर्यंत रूफ (मेट्रो स्टेशनचे छत) उभारण्यासाठी कॉलम उभे करून, त्यावर जॅक बिम टाकण्यात येणार असून, जॅक बिम उभारल्यानंतर त्यावर राफ्टर उभारण्यात येणार आहे. सदरचे काम हे 60 टनी मोबाईल क्रेनच्या सहाय्याने करण्यात येणार आहे. यामुळे माजिवडा ब्रिजवरून मुंबईकडून नाशिक अथवा घोडबंदरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक चार दिवस रात्री पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
प्रवेश बंद (1)- मुंबईकडून माजिवडा उडाण पुलावरून ज्युपीटर बाय जंक्शन मार्गे घोडबंदरकडे अथवा भिवंडीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना व्हिव्हियाना मॉलसमोरील ब्रिज चढणीचे सुरुवातीला दुभाजकाजवळ 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग- सदरचे मार्गावरून जाणारी सर्व प्रकारची वाहने ही ज्युपीटर हॉस्पीटलसमोरील स्लीप रोडने पुढे सरळ जाऊन कापूरबावडी सर्कलमार्गे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद (2)- मुंबईकडून माजिवडा उड्डाणपुलावरून ज्युपीटर वाय जंक्शन मार्गे नाशिककडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना व्हिव्हियाना मॉलसमोरील ब्रिज चढणीचे
पर्यायी मार्ग- सदरचे मार्गावरून जाणारी सर्व प्रकारची वाहने ही ज्युपीटर हॉस्पीटल समोरील स्लीप रोडने पुढे सरळ जावून गोल्डन कॉस मार्गे इच्छित स्थळी जातील. (हेही वाचा: Mumbai Rash Driving Cases: मुंबईत 2024 मध्ये बेदरकारपणे गाडी चालवल्याबद्दल 10,000 हून अधिक गुन्हे दाखल; वाहनचालकांना 526 कोटी रुपयांचा दंड)
Majiwada Flyover Night Closure:
कापूरबावडी वाहतूक उपविभागाचे हद्दीत दि. २८/०५/२०२५ ते दि. ३१/०५/२०२५ रोजी पर्यंत मुंबई -नाशिक -घोडबंदर माजीवाडा उड्डाणपुलावरील मुख्य वाहिनीवर ज्युपिटर या ठिकाणी मेट्रोचे काम करण्यात येणार असून वाहतूक सुरळीत राहावी यासाठी पर्यायी मार्ग. pic.twitter.com/7Xl6uln4ji
— Thane City Police -ठाणे शहर पोलीस (@ThaneCityPolice) May 27, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)