
Toddler Metro Mishap: मुंबई मेट्रोच्या (Mumbai Metro Incident) यलो लाइन 2A (Mumbai Metro Yellow Line 2A) वर रविवारी, 29 जून रोजी, एक मोठा अपघात टळला. बांगूर नगर स्थानकावर एका दोन वर्षांच्या चिमुकल्याने चुकून मेट्रोच्या दरवाजातून बाहेर पाऊल टाकले, आणि त्याच क्षणी दरवाजे बंद झाले. या प्रसंगात मेट्रो स्टाफ सदस्य संकेत चोढणकर (Sanket Chodankar Hero) यांनी तातडीने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे (Metro Safety Mumbai मोठा अनर्थ टळला आणि मुलाला होणारी संभाव्य इजाही टळली. ही घटना रविवरी (29 जून) रोजी बांगुर नगर स्टेशनवर (Bangur Nagar Metro Station) दरवाजे बंद होत असताना घडली. ज्यामध्ये हा मुलगा चुकून मेट्रो ट्रेनमधून बाहेर पडला आणि डब्यात असलेल्या त्यांच्या पालकांपासून तो वेगळा झाला.
काय आहे प्रकरण?
मुंबई मेट्रो लाईनवरील बांगुर नगर स्टेशनवरील संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, मेट्रो प्लॅटफॉर्मवर थांबलेली असताना दरवाजे बंद होण्याच्या काही क्षण आधी चिमुकला गाडीतून उतरतो आणि त्याचे आईवडील गाडीतच राहतात. प्लॅटफॉर्मवर उपस्थित स्टेशन अटेंडंट संकेत चोढणकर यांनी ही गंभीर बाब त्वरित लक्षात घेतली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता ट्रेन ऑपरेटरला सूचना दिली आणि ट्रेन थांबवण्यात आली. त्यानंतर त्यांनी त्या बालकाजवळ जाऊन त्याची सुरक्षितता तपासली. काही क्षणांत दरवाजे पुन्हा उघडण्यात आले आणि बालकाचे पालकांशी पुनर्भेट झाली. (हेही वाचा, Mumbai Metro Line 3 Phase 2A Inauguration: बीकेसी-वरळी भुयारी मेट्रो मार्गिकेची प्रतिक्षा संपली; 10 मे पासून नागरिकांच्या सेवेत)
MMMOCL कडून स्पष्टीकरण
महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (MMMOCL) ने एक्स (माजी ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर संकेत चोढणकर यांच्या सतर्कतेचे कौतुक करताना म्हटले, बांगूर नगर मेट्रो स्थानकावर कोणीही अपेक्षा केली नसेल की 2 वर्षांचा मुलगा एकटाच गाडीतून उतरून उभा राहील. पण आमच्या स्टेशन अटेंडंट संकेत चोढणकर यांच्या तीव्र निरीक्षणामुळे संभाव्य दुर्घटना टळली. MMMOCL ने पुढे लिहिले, प्रत्येक दिवशी प्रवाशांच्या सुरक्षेकरिता अशा प्रकारचे प्रसंगावधान आणि समर्पण मेट्रो प्रवास अधिक सुरक्षित बनवते.
मेट्रो स्टेशनवरील थरारक प्रसंगाचा व्हिडिओ
🚨Alertness and quick response save the day!🚨
At Bangur Nagar Metro Station, little did anyone expect a 2-year-old to step out of the train alone just as the doors were closing. But thanks to the sharp eyes of our Station Attendant Sanket Chodankar, a potential mishap was… pic.twitter.com/CJYzsD5pVK
— Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd (@MMMOCL_Official) June 30, 2025
संकेत चोढणकर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव
बांगूर नगर हे यलो लाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रो लाइन 2A वरील एक स्थानक आहे. ही लाईन दहिसर ईस्ट ते डीएन नगरपर्यंत 18.6 किलोमीटर लांब असून, या उंचावलेल्या मार्गावर एकूण 17 स्थानके आहेत. या मार्गाद्वारे बोरिवली, कांदिवली, मालाड आणि अंधेरीसारख्या महत्त्वाच्या उपनगरांना जोडले गेले असून, हजारो प्रवासी दररोज या मार्गाचा वापर करतात. या घटनेनंतर सोशल मीडियावर मेट्रो कर्मचाऱ्याच्या जागरूकतेचे मोठ्या प्रमाणावर कौतुक केले जात आहे.