
India National Cricket Team vs England National Cricket Team: भारतीय कसोटी संघाचा कर्णधार बनताच शुभमन गिलने (Shubman Gill) विक्रमांची अक्षरशः विक्रमांचा पाऊस पाडला आहे. कर्णधार म्हणून चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना, त्याने सलग दोन सामन्यांमध्ये शतके झळकावली आहेत. बर्मिंगहॅम कसोटीत (Birmingham Test) द्विशतक झळकावून त्याने एक-दोन नव्हे, तर असंख्य विक्रम आपल्या नावावर केले आहेत. चला, शुभमन गिलने बर्मिंगहॅम कसोटीत नोंदवलेल्या 5 मोठ्या विक्रमांवर एक नजर टाकूया. (हे देखील वाचा: Shubman Gill New Record: शुभमन गिलने विराट कोहलीचा 'महारिकॉर्ड' मोडला; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय!)
शुभमन गिलने मोडलेले 5 मोठे विक्रम
इंग्लंडमध्ये भारतीय फलंदाजाने केलेली सर्वात मोठी कसोटी खेळी
शुभमन गिल इंग्लंडच्या भूमीवर भारतासाठी सर्वात मोठी कसोटी खेळी करणारा फलंदाज बनला आहे. त्याने सुनील गावस्कर यांचा 1979 साली इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात केलेल्या 221 धावांचा विक्रम मोडला आहे.
इंग्लंडमध्ये द्विशतक झळकावणारा पहिला आशियाई कर्णधार
शुभमन गिल आता इंग्लंडमध्ये द्विशतक झळकावणारा पहिला आशियाई कर्णधार ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशानच्या नावावर होता, ज्याने इंग्लंडमध्ये कर्णधार म्हणून 193 धावा केल्या होत्या.
आशियाबाहेर कसोटीत भारतासाठी सर्वात मोठी धावसंख्या
शुभमन गिल आता आशियाबाहेर भारतासाठी कसोटीत सर्वात मोठी वैयक्तिक धावसंख्या करणारा फलंदाज बनला आहे. यापूर्वी आशियाबाहेर कसोटीतील सर्वात मोठ्या वैयक्तिक धावसंख्येचा भारतीय विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता, ज्याने सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथे 241 धावा केल्या होत्या.
कसोटीत द्विशतक झळकावणारा दुसरा सर्वात युवा भारतीय कर्णधार
शुभमन गिल आता कसोटीत द्विशतक झळकावणारा दुसरा सर्वात युवा भारतीय कर्णधार ठरला आहे. त्याने 25 वर्षे 298 दिवसांचे असताना हा पराक्रम केला आहे. त्याच्यापुढे केवळ मन्सूर अली खान पटौदी आहेत, ज्यांनी 23 वर्षे 39 दिवसांचे असताना द्विशतक झळकावले होते.
कसोटीत 250+ धावा करणारे केवळ सहावे भारतीय
शुभमन गिल कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 250+ धावा करणारे केवळ सहावे भारतीय खेळाडू बनले आहेत. त्याच्या आधी वीरेंद्र सेहवागने एकूण 4 वेळा अशी कामगिरी केली होती. तर व्हीव्हीएस लक्ष्मण, राहुल द्रविड, करुण नायर आणि विराट कोहली यांनी प्रत्येकी एकदा हा पराक्रम केला होता. आता गिल देखील या यादीत सामील झाला आहे.