Mumbai Rain: मुंबईत काल सोमवारी 26 मे रोजी मुसळधार पाऊस झाला. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मुसळधार पाऊस (Mumbai Monsoon 2025) झाल्याने शहरात 79 पावसाशी संबंधित घटना घडल्या. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC)नुसार, शॉर्ट सर्किटमुळे 25 आगीच्या घटना घडल्या, तर झाडे पडण्याच्या 45 घटनांमुळे मोठे नुकसान झाले. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. नऊ ठिकाणी संरचनात्मक नुकसान झाल्याची नोंद झाली. ज्यामुळे सतत पाणी साचत असताना आणि गर्दीच्या ठिकाणी नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. सेंट झेवियर्स कॉलेजजवळ पडलेल्या झाडामुळे 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ज्यामध्ये तीन जण जखमी झाले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. माहीम पश्चिमेकडील एका दुमजली घराचा काही भाग कोसळला. ज्यामध्ये दोन रहिवासी अडकले. बीएमसी अधिकाऱ्यांनी सांगितले की दोघांनाही सुरक्षितपणे वाचवण्यात आले आहे.
Mumbai experiences heavy rainfall with the early arrival of the monsoon, leading to 79 rain-related incidents across the city. These included 25 fire cases due to short circuits, 45 tree fall incidents and structural damage reported at 9 locations. The downpour caused severe… pic.twitter.com/WGA3HAsivp
— IANS (@ians_india) May 27, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)